तरुण भारत पेपर

  1. Marathi News / Top Stories
  2. Marathi News
  3. येत्या 15वर्षांत तरुण भारत चीनला हरवेल?
  4. पुनर्जीवित ‘पार्वती’चे प्रेम अन् ‘शेरनी’च्या सिंहांची हाक! dr rajendra sinh writes rajasthan parvati and sherani river water childrens agriculture
  5. अमली पदार्थांसह उच्चशिक्षित तरुणाला अटक


Download: तरुण भारत पेपर
Size: 5.2 MB

Marathi News / Top Stories

Marathi News Online - A Quick Guide Sumanasa.com aggregates Marathi Newspapers • • • • • • • • Broadcasting • Online Portals • Listed below are some of the popular Marathi newspapers that publish Marathi news in ePaper, non-unicode or image formats: • • • • • • Other local Marathi newspapers including • Other Marathi websites of interest include Other Marathi and Maharashtra news sections on Sumanasa.com Read other Marathi news sections including • महाराष्ट्र टाइम्स (12 hours ago) 360 • महाराष्ट्र टाइम्स (14 hours ago) 226 • News18 लोकमत (11 hours ago) 207 • News18 लोकमत (11 hours ago) 162 • महाराष्ट्र टाइम्स (14 hours ago) 156 • महाराष्ट्र टाइम्स (15 hours ago) 137 • महाराष्ट्र टाइम्स (15 hours ago) 132 • महाराष्ट्र टाइम्स (15 hours ago) 114 • News18 लोकमत (13 hours ago) 98 • News18 लोकमत (9 hours ago) 97

Marathi News

लहु काळेंची ‘सकारात्मक व्यंगचित्रे’ ही ओवी आहे, जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार लहु काळे यांच्या ‘चकाट्या’ नामक चौकट कार्टुनची...!! ‘अ‍ॅग्रोवन’ आणि ‘बळीराजा’ या नियतकालिकांमध्ये लहु काळे ‘कार्टुन’ चित्रे देतात. एक साधारण अहवाल द्यायचा ठरविलं, तर २००७ ते २०१८ या काळामध्ये ‘अ‍ॅग्रोवन’मध्ये ‘चकाट्या’नामक चौकटी लहु काळेंनी ३ हजार, ९२५ एवढी व्यंगचित्रे रेखाटली आहेत. या आकडेवारीवरून आपल्या ध्यानात येईल की, लहु काळे यांचं ‘व्यंगचित्रण कलेतील’ योगदान किती मोठं आहे! त्यांच्या या प्रकाराला ‘पॉकेट कार्टुन’ अशी ओळख प्राप्त झालेली आहे. त्यांच्या या योगदानाची दखल ‘जी २०’, ‘जी-७’ आणि ‘क्रिप्टो’चे नियमन ‘व्हर्च्युअल डिजिटल असेट’ (व्हीडीए) मालमत्ता (क्रिप्टो मालमत्ता) साठी अपेक्षित असलेल्या नियामक घडामोडींवर चर्चा करण्यासाठी ‘जी ७’ राष्ट्रे अलीकडेच त्यांच्या शिखर परिषदेपूर्वी एकत्र आली होती. इतर घटकांसह हे राष्ट्रांसाठी अजेंडाच्या शीर्षस्थानी आहे. कारण, ते ‘व्हीडीए’साठी त्यांच्या देशांतर्गत धोरणांवर वेगाने काम करत आहेत. ‘जी २०’ गटाप्रमाणेच राष्ट्रांनी एकत्रितपणे आर्थिक स्थिरता मंडळाने निर्धारित केलेल्या मानकांशी त्यांचे नियम संरेखित करण्यासाठीचा निर्णय घेतला आहे. त्याविषयी सविस्तर...

येत्या 15वर्षांत तरुण भारत चीनला हरवेल?

या वर्षापासून चीनमध्ये लोकसंख्या घटण्यास सुरुवात झाली आहे, तर पुढील वर्षी भारताची लोकसंख्या १४२.८६३ कोटी, म्हणजे चीनपेक्षा ३० लाख अधिक होईल. पण, या आकडेवारीवरून काही चिंता निर्माण होतात. चीनमधील लोकसंख्या घटण्याचे मुख्य कारण म्हणजे महिलांच्या जननक्षमतेमध्ये एका कालखंडात झालेली तीव्र घट, त्यामुळे आज चीनची तरुणाई अचानक कमी झाली आहे. चीनमध्ये १९८७ मध्ये २०-५९ वर्षे वयोगटातील लोकांची टक्केवारी ५० होती, ती २०११ मध्ये ६१.५ पर्यंत वाढली. चीनने सांख्यिकीय फायद्यातून प्रचंड प्रगती केली तोच हा काळ होता. आता ते चक्र उलटणार आहे. भारतासाठी ही एक चांगली संधी आहे, कारण त्याचा सांख्यिकीय लाभांश घेण्याचा कालावधी २०१८ पासून सुरू झाला आहे, तो पुढील १७ वर्षे चालेल. पण, इथे प्रश्न असा आहे की, अधिक संख्येने तरुणांच्या उपस्थितीनेच फायदा होणार नाही. गर्भापासून बालकांना उत्तम पोषण आहार आणि १८ वर्षे वयापर्यंत उत्तम शिक्षण व सुविधा देणे ही राज्याची पहिली जबाबदारी असेल. मग हेही पाहावे लागेल की, शिक्षणाची दिशा काय आहे? आतापर्यंत चार वर्षांचा सांख्यिकीय लाभांश व्यर्थ गेला आहे. बालकांचे कुपोषण ही अजूनही मोठी समस्या आहे. चीनच्या या दुबळेपणाचा फायदा घ्यायचा असेल तर भारतातील सरकार आणि समाजाला दूरदृष्टी ठेवावी लागेल.

पुनर्जीवित ‘पार्वती’चे प्रेम अन् ‘शेरनी’च्या सिंहांची हाक! dr rajendra sinh writes rajasthan parvati and sherani river water childrens agriculture

- डॉ. राजेंद्र सिंह (तरुण भारत संघ) सभ्यता आणि संस्कृतीच्या भरभराटीने राजस्थानमधील ‘शेरनी’ आणि ‘पार्वती’च्या नदी खोऱ्यातील मुले-मुली सिंहासारखी जगू लागली आहेत. पाणी आल्याने बंदूक सोडून फावडे घेत शेती सुरु झाली आहे. सर्वांना हे परिवर्तन पाहण्यासाठी या परिसरात १९ व २० मे रोजी भेटण्यासाठी ‘तरुण भारत संघा’ने आमंत्रित केले आहे. या मूकक्रांतीची कहाणी. ‘शेरनी’ आणि ‘पार्वती’ या दोन्ही नद्या मिळून एकूण ८४१ चौरस किलोमीटरचे पाणलोट क्षेत्र तयार करतात. त्यामध्ये ‘तरुण भारत संघा’तर्फे एकूण १६० जलसंधारणाची कामे करण्यात आली. शेरनी नदीत ११ पाणलोट क्षेत्र आहेत. त्यात लहान ५०० हेक्टरपेक्षा कमी आणि सात मोठे ५०० हेक्टरपेक्षा अधिक आहेत. पार्वती नदीचा सर्वात लांब प्रवाह ७० किलोमीटर आहे. पाच नद्या-तेवर, गोदेर, खैरार भामाया आणि शेरनी नदी आणि राजहवादेह, गुरेर, बठुआ खोह, कुंड, माराधाता असे पाच नाले मिळतात. सर्वात मोठा पाण्याचा प्रवाह तेवर नदीच्या नावाने ओळखला जातो. तेवर नदीत ‘तरुण भारत संघा’ने पूर्ण काम केले. त्यात पाच लहान पाणलोट आहेत. पाच मोठे नाले आणि पाच लहान नद्या ‘पार्वती’ नदीला मिळतात. म्हणून पार्वती ही २२ प्रमुख पाणलोट आणि ४३ लहान पाणलोटांची नदी आहे. पार्वती आणि शेरनी या दोन्ही नद्यांना जमिनीला समांतर आडव्या भेगा आहेत. त्यात लाल रंगाचे दगड आहेत. माती कमी आहे. प्राचीन काळी जी माती अरवलीच्या पश्चिमेकडून वाऱ्याने गोठली होती, ती वालुकामय माती आहे. जी आता पाण्याच्या संपर्कामुळे गुळगुळीत आणि चिकणमाती झाली. त्यामुळे ‘पार्वती’ आणि ‘शेरनी’ नदीच्या पाणलोट क्षेत्रात सात टक्के जमीन जंगल आहे. बहुतेक जमीन कुरण आणि डोंगराळ आहे. जंगल जमीन आणि समलातदेहवर कमी जंगल आहे. जंगल हळूहळू वाढत आहे. पाणी आल्याने जिथे ...

अमली पदार्थांसह उच्चशिक्षित तरुणाला अटक

नवी मुंबई, ता.३ (वार्ताहर) : नेरूळ सेक्टर-१४ मधील पामबीच सर्व्हिस रोडवर एलएसडी पेपर या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला नवी मुंबई पोलिसांनी सापळा लावून अटक केली. मोहमंद फैसल खतीब (२७) असे या तरुणाचे नाव असून त्याच्याजवळ असलेला ६ लाख रुपये किमतीचा १ ग्रॅम वजनाचा एलएसडी पेपर हा अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केला आहे. सीवुड्समध्ये राहणारा मोहमंद फैसल खतीब हा तरुण आर्किटेक्चरमध्ये पदवीधर असून सध्या तो उच्च शिक्षण घेत आहे. हा तरुण एलएसडी पेपर या अमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नेरूळ सेक्टर-१४ मध्ये पामबीच सर्व्हिस रोडवरून बुधवारी (ता. ३१) रात्री सव्वा नऊच्या सुमारास मोहमंद फैसल खतीब याला ताब्यात घेतले होते. पोलिसांना त्याच्याकडे ६ लाख रुपये किमतीचे १ ग्रॅम वजनाचे एलएसडी पेपर सापडले आहेत. त्याच्याविरोधात नेरूळ पोलिस ठाण्यात गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८(क), २२ (क) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. या कारवाईत अटक केलेला तरुण सुस्थापित घरातील असून पैशांच्या हव्यासापोटी हा धंदा करत असल्याचे तपासात आढळून आले आहे.